काही विचार

डोळे तलाव नाही
तरी सुद्धा ते भरून येतात.
     मन शरीर नाही
     तरी सुद्धा ते घायाळ होतं.
दुश्मनी बीज नाही
तरी सुद्धा ती रूजली जाते.
     ओठ कापड नाही
      तरी सुद्धा ते शिवले जातात.
निसर्ग पत्नी नाही
तरी सुद्धा तो रागावतो.
      बुद्वि लोखंड नाही
      तरी सुद्धा तिला कधी गंज चढतो.
आणि
     माणूस ऋतु नाही
     तरी सुद्धा तो नेहमीच बदलत असतो.

No comments:

Post a Comment