स्त्रिचा पदर

••

    काय  जादुई  शब्द  आहे 
           *हो  मराठीतला !*

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन
             अक्षरी  शब्द.

       *पण  केवढं  विश्‍व*
   *सामावलेलं  आहे त्यात....!!*

किती  अर्थ,
किती  महत्त्व...
काय  आहे  हा  पदर.......?

*साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर*
*रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा*
*भाग.......!!*

तो   स्त्रीच्या  *लज्जेचं   रक्षण*  तर
करतोच,
सगळ्यात  महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.
पण,
आणखी   ही
बरीच  *कर्तव्यं*  पार  पाडत  असतो.

या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल,
        ते  सांगताच  येत  नाही.

सौंदर्य  खुलवण्यासाठी *सुंदरसा*
पदर असलेली *साडी* निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
*पदरांची* जणू स्पर्धाच लागलेली
असते.
सगळ्या  जणींमध्ये चर्चाही
तीच. .....!!

लहान  मूल  आणि
*आईचा  पदर,*
हे   अजब  नातं  आहे.
मूल  तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन  *अमृत  प्राशन* करण्याचा
हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
लागलं,
की  *त्याचं  तोंड  पुसायला*
आई  पटकन  तिचा  *पदर*  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-ताना  आईच्या *पदराचाच आधार* लागतो.
एवढंच   काय,
जेवण
झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  *आईचा  पदरच*  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं *पदराला  नाक* जरी
पुसलं,
तरी  *ती  रागावत  नाही ...*

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला *आईचा पदरच  सापडतो.....!!*

महाराष्ट्रात  तो  *डाव्या खांद्या  वरून*
मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,
मध्य प्रदेशात
*उजव्या खांद्यावरून*
पुढं मोराच्या.
पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
*चेहरा  झाकून  घेतात ..*
तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग
दर्शवण्यासाठी मोठ्या
फणकाऱ्यानं *पदरच   झटकतात !*

     सौभाग्यवतीची  *ओटी* भरायची
ती  पदरातच  अन्‌  *संक्रांतीचं   वाण*
लुटायचं ते  *पदर*  लावूनच.

बाहेर   जाताना   *उन्हाची   दाहकता*
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर
*ओढला  जातो,*
तर  थंडीत  अंगभर
पदर
लपेटल्यावरच *छान  ऊब*
मिळते....!!

काही   गोष्टी *लक्षात   ठेवण्यासाठी*
पदरालाच  *गाठ*  बांधली   जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या
*जन्माची गाठ* ही नवरीच्या   पदरालाच,
नवरदेवाच्या  उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

*पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी*
*वापरला  जातो  ना.....?*

नवी.  नवरी नवऱ्याशी बोलताना
*पदराशी चाळे करते,*
पण संसाराचा
संसाराचा  *राडा  दिसला,*
की  पदर
*कमरेला  खोचून*
कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   *चुका  " पदरात "  घे.‘*

मुलगी मोठी  झाली, की *आई* तिला
साडी   नेसायला   शिकवते,
पदर
सावरायला शिकवते   अन्‌   काय
म्हणते  अगं,
*चालताना  तू  पडलीस*
*तरी  चालेल. ....!!*

*पण,  " पदर "  पडू   देऊ   नकोस !*
अशी आपली
*भारतीय संस्कृती.*

अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा *विनयभंग* तर  दुरच्  ती.
रस्त्यावरून चालताना लोकं
तिच्याकडे *वर नजर* करून  साधे पाहणार ही नाहीत..
ऊलटे तिला वाट देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  *"पदरात" .......

*ही आहे आपली भारतीय संस्कृती*

*स्त्री चा आदर करा*

No comments:

Post a Comment