एक थरारक सत्यघटना :
मी माझ्या मित्राकडे सत्यनारायणाच्या पुजेसाठी आमंत्रणावर गेलो होतो. नविन गृहप्रवेशानिमित्त पुजा ठेवली होती. पोचलो तेव्हा नुकतीच आरती संपत आली होती. सगळे चेहरे नविन होते. इकडे तिकडे बघत गर्दीत पुढे येऊन उभा राहीलो. आरती संपुन आरतीची थाळी समोर आली, लगबगीने खिश्यात हात गेला, चिल्लर काही सापडली नाही. ५ रूपयाची फाटकी नोट हातात आली, कुणाचे लक्ष नाही असे पाहून ती फाटकी नोट आरतीच्या ताटात ठेवली. तेवढ्यात पाठीमागुन कुणीतरी खांद्यावर हळु थाप दिली..
मागे वळून पाहीले तर एक वयस्क गृहस्थ हातात ५०० ची नोट पुढे करत होते. मी ती घेतली आणि पटकन आरतीच्या ताटात ठेवली. क्षणभर स्वत:ची लाज वाटली.
आपण ५ रू आरतीत ठेवावे, ती पण फाटकी नोट, आणि त्या गृहस्थाने चक्क ५०० रूपयाची कोरी करकरीत नोट आरतीत ठेवण्यास द्यावी...
मागे वळून त्यांना म्हटले,
"व्वा... कमाल आहे तुमची..!!!".
त्यावर त्याने थोडसेे दात दाखवत हसत उत्तर दिले..
"अहो कमाल कसली त्यात, तुमच्याच खिश्यातुन खाली पडली होती ती नोट... मी फक्त उचलून तुम्हाला दिली एवढच... पुढच्या वेळेस काळजी घ्या!!"
😁😁
No comments:
Post a Comment