एका देवळात असलेली प्रचंड गर्दी एक मुलगा
कुतूहलाने पाहत होता;
तेवढ्यात एक माणूस त्याच्याजवळ येऊन त्याला
म्हणाला,
"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन
होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष
व्यवस्था आहे, मला ५०१/- रुपये दे, मी तुला थेट दर्शन
करवून देतो!
मुलगा म्हणाला,-"५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी आलोय!"
माणूस-"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का? आणि तू कोण आहेस?"
मुलगा पुन्हा म्हणाला,- "मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या घराजवळ येऊन भेट!")
माणूस-"तू देवाला समजतोस तरी काय?
मुलगा,-"तेच तर मी म्हणतोय...
"तुम्ही सर्व जण देवाला
समजता तरी काय..?
पैसे कमावण्याचे साधन?"
''देवाचं'' आणि ''माझं'' एक सुंदर नातं आहे ,
मी जास्त काही मागत नाही आणि तो मला कधीच कमी पडू देत नाही ....
💐 आपला दिवस आनंदमय असो💐
देवळांत देव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment