...
😊😊😊😊😊
आई समजवून घ्यायला
फक्त आई समजायलाच हवी
स्वयंपाक करायला आई हवी
गरम जेवण वाढायला आई हवी
अभ्यासात मदतीला आई हवी
तुला काही कळत नाही
ऐकून घ्यायला आई हवी
खरेदीला जाताना आई हवी
निवड करताना आई हवी
नसतानाही राजपुत्र म्हणायला आई हवी
गालावरून हात फिरवायला आई हवी
मनासारखं घडवायला आई हवी
बाबांना समजवायला आई हवी
ओरडा खाताना आईच हवी
पदरामागे लपायला आई हवी
आपली बाजू सावरायला आई हवी
पाठीवरून हात फिरवायला आई हवी
कँरमचा चौथा मेंबर आई हवी
पत्ते खेळताना ही आई हवी
बुद्धिबळात भिडू म्हणून आई हवी
भूक लागली की आई हवी
पडल्यावर सावरायलाआई हवी
लागलं खुपलं आईच हवी
मन मोकळं करायला आई हवी
न बोललेलं कळायला आई हवी
बाबा नि माझ्यात सेतु म्हणून आई हवी
माझ्या वाटची बोलणी खायला आई हवी
माझी बाजू मांडायला आई हवी
माझी बाजू पटायलाही आईच हवी
परिस्थितीचा राग काढायला आई हवी
तुझ्यामुळे घडलं सारं ऐकायला आई हवी
रागराग करायलाही आई हवी
निरपेक्ष प्रेम शिकवायला आई हवी
पहिलं प्रेम न सांगता कळायला आई हवी
डोळ्यांतलं समाधान कळायला आई हवी
एकटेपणात सांभाळून घ्यायलाआई हवी
नजरेने आधार द्यायला आई हवी
मी आहे रे विश्वास द्यायला आई हवी..😊😊😊
No comments:
Post a Comment