एकदा एक सोनार सोन्याचा दागिना घडवत होता. तो दागिना घडवताना सोन्याला ब-याचदा हातोडीने ठोकत होता....
त्याच्याच बाजूला एक लोहार लोखंड घेऊन त्याची वस्तू बनवत होता.
वस्तू बनवित असताना ठोकल्यामुळे त्या लोखंडातून खुप आवाज येत होता. सोन्यावर घाव बसताना मात्र खुप आवाज येत नव्हता.
सोनं लोखंडाकडे पाहून हसत म्हणाले " अरे वेड्या कशाला एवढा आवाज करतोस ? मी बघ किती शांत आहे, खरतर मलाही त्रास होतोय पण मी तुझ्या एवढा आवाज नाही करत."
त्यावर लोखंड म्हणाले " तुला माझ दु:ख कसे कळणार ? " तु ती हातोडी पाहिलीस का ?
सोनं म्हणाले , हो तो तुझाच एक भाग आहे ती.
कसनुसे हसत लोखंड जड आवाजात म्हणालं ' हो म्हणूनच मला जास्त वेदना होत आहेत. '
जेव्हा परके आपल्याला दुखावतात तेव्हा आपल्याला जास्त लागत नाही, परंतु जेव्हा आपलेच आपल्याला दुखावतात तेव्हा खुप वेदना होतात.
म्हणूनच आयुष्यात कधीच आपल्या माणसांना दुखवू नका, त्यांना जाणून घ्या आणि नात्यातील सुंदरता जपा आणि अनुभवा.
No comments:
Post a Comment