भाऊबीजेच्या शुभेच्छा

|| श्री ||
रक्षावे भगिनीस
असे बांधवाने
जसे रक्षीले द्रौपदीस
श्रीकृष्ण माधवाने ||

जपावे या बंधनास
निरामय भावनेने
जसे जपले हळूवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने ||

द्या पूर्णत्व नात्यास
आज बंधनाने
जसे दिले पूर्णत्व
दीपावलीस द्वितीयेने ||

ओवाळणी दिली आज
काव्यरूपी विनम्रतेने
जशी दिली तिमीरात
पणतीस प्रकाशाने ||

|| भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ||

No comments:

Post a Comment